1/8
Maratha Pariwar screenshot 0
Maratha Pariwar screenshot 1
Maratha Pariwar screenshot 2
Maratha Pariwar screenshot 3
Maratha Pariwar screenshot 4
Maratha Pariwar screenshot 5
Maratha Pariwar screenshot 6
Maratha Pariwar screenshot 7
Maratha Pariwar Icon

Maratha Pariwar

Ke Ru Re
Trustable Ranking Icon
1K+Unduhan
14MBUkuran
Android Version Icon5.1+
Versi Android
23.28(07-07-2023)
-
(0 Ulasan)
Age ratingPEGI-3
Unduh
RincianUlasanInfo
1/8

Deskripsi Maratha Pariwar

|| मऱ्हाटा समृद्ध व्हावा ||

|| सकळांसी वाट दावा ||


मराठ्यांच्या प्रगतीचा नवा साथीदार, मराठा परिवार !!


1) मराठा व्यवसाय नोंदवा आणि जवळच्या मराठा बांधवांचे व्यवसाय शोधा.

2) नोकरीच्या संधीची माहिती मिळवा आणि तुम्हाला माहित असलेल्या नोकरी इतर बांधवांपर्यंत पोचवा.

3) पिकाचे नियोजन करा, शेतमालाची खरेदी विक्री करा.

4) लग्नासाठी मराठा स्थळे शोधा.

5) जुन्या वस्तूंची खरेदी विक्री करा.


आगामी सेवा -

5) शिक्षण

6) स्त्रीशक्ती

7) साहित्य

8) मदत

9) शासकीय योजना आणि बरेच काही.


1) महाराष्ट्र मधील क्षत्रिय हिंदू लोकांचा समुदाय म्हणजे मराठा समाज. कित्येक शतकांपासून मराठा समाज हा इतर समाजा साठी मोठ्या भावा सारखा राहिलेला आहे. राज्यकर्ता असलेल्या मराठा समाजातील बहुसंख्य लोक स्वातंत्र्यानंतर आर्थिक बाजूने कमकुवत होत गेले. मूठभर समाज राजकारण आणि उद्योगधंद्या मध्ये प्रगती करत होता परंतु बहुसंख्य मराठा समाज शेती आणि नोकरी यातच गुरफटून गेला.

सध्याच्या काळात मराठा समाजाला स्वतःला सशक्त पणे उभ रहायचे असेल तर एकमेकांनाच आधार देण्याची गरज आहे. हुंडा, व्यवसायाची धास्ती, शेतीबद्दल उदासीनता, व्यसन अशा अनेक चुकीच्या गोष्टीपासून परिवर्तित करून समाजातील तरुणांना चांगल्या मार्गाला लावणे या उद्देशाने 2020 मध्ये मराठा परिवार ची स्थापना झाली आहे.


2) या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सर्व मराठा समाजाला एकत्र जोडून एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. समाजासमोर खूप वेगवेगळे प्रश्न किंवा गरजा आहेत. त्यातील अती महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्या परिवाराच्या माध्यमातून काम करणार आहोत.


3) आरक्षण मिळवणे हा पहिला टप्पा आहे. आपला समाज खूप मोठा असल्यामुळे फार कमी लोकांना आरक्षणाचा फायदा होणार आहे. समाजातील सर्व थरांतील लोकांना फायदा होण्यासाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय, नोकरी, लग्न, शेती, शिक्षण, बातम्या, साहित्य, मदत, स्त्रीशक्ती अशा विविध घटकांवर ऍप, पेज आणि ग्रुप मार्फत काम चालू करत आहोत.


4) इतर व्यावसायिक समाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपण हि व्यवसायात उतरले पाहिजे, आणि त्यांच्याप्रमाणेच आपण हि आपल्या बांधवांना व्यवसायात पाठिंबा दिला पाहिजे.

जेंव्हा घेणारे, विकणारे आणि निर्माता मराठा आपणच राहू, तेंव्हा मराठा समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल. मराठा माणसाकडून खरेदी करू आणि आपल्या मराठा व्यावसायिकांना पाठबळ देऊ. ज्यामुळे नवीन व्यवसायात उतरणाऱ्या लोकांना हुरूप येईल.


5) आपण जातीय'वादी' आहोत का? तर नाही. आपल्या जाती साठी इतर कोणासोबत 'वाद' घालण्यापेक्षा शांतपणे समाजाच्या उद्धारासाठी काम करायचं हे आपले ध्येय आहे.

आपला समाज बळकट करत असताना, इतर कोणत्याही जाती धर्म किंवा समुहा बद्दल किंचितही वाईट चुकीचे विचार असणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण आम्ही कधीही विसरणार नाहीत.


6) गावगाड्यामध्ये राहायचं, समाजात वावरायच तर फक्त मराठ्यांचा विचार करून चालणार नाही हे जरी सत्य असले तरी आतापासून सर्वठिकाणी किमान पहिली पसंदी (प्राथमिकता/priority) मराठ्यांना द्यायची इतकं सोप काम आपण नक्कीच करू शकू.


7) या प्रवासात मराठा समाजाने स्वतःला अधिकाधिक समृद्ध करून नंतर इतर समाजातील दुर्बल, गरजू लोकांसाठी मदतीचा हात पुढे करायचा आहे.

माणुसकीची शिकवण मराठा कधीही विसरला नाही आणि विसरणार नाही.


|| जय जिजाऊ जय शिवराय ||

Maratha Pariwar - Versi 23.28

(07-07-2023)
Apa yang baruFeatures improvements.

Belum ada ulasan atau penilaian! Untuk meninggalkan ulasan pertama,

-
0 Reviews
5
4
3
2
1

Maratha Pariwar - Informasi APK

Versi APK: 23.28Paket: com.marathapariwar.co
Kompatibilitas Android: 5.1+ (Lollipop)
Pengembang:Ke Ru ReKebijakan Privasi:https://marathapariwar.com/#termsandconditionIzin:13
Nama: Maratha PariwarUkuran: 14 MBUnduhan: 0Versi : 23.28Tanggal Rilis: 2024-06-11 19:21:47Layar Minimal: SMALLCPU yang Didukung:
ID Paket: com.marathapariwar.coSHA1 Signature: F3:0B:B5:4C:D7:E8:BE:AE:90:9F:73:30:24:62:5B:7D:2D:A4:49:14Pengembang (CN): AndroidOrganisasi (O): Google Inc.Lokal (L): Mountain ViewNegara (C): USProvinsi/Kota (ST): California

Aplikasi pada kategori yang sama

Anda juga mungkin suka...